प्रस्तावना

असे म्हटले जाते की महाराष्ट्र ही संतभूमी आहे़. इथे अनेक संतांनी अदभुत अवतार कार्य केले़, अनेक संप्रदायांची स्थापना केली़. प्रत्येक संप्रदायाचा ईश्वर प्राप्तीकडे बघण्याचा वैशिष्टयपूर्ण असा एक निराळा दृष्टीकोन असतो़. अत्यंतिक कर्मनिष्टा जोपासणारा असा दत्त संप्रदाय, अखंड हरिनामाच्या गोडीत बुडलेला वारकरी संप्रदाय आणि आत्मिक व सामाजिक उन्नती घडवू पहाणारा राम संप्रदाय जरी तात्विक पातळीवर थोडे वेगळे भासले तरी ही संप्रदायीन तत्व महाराष्ट्रात एकत्र नांदतात आणि नांदतच नाहीत तर एकमेकांच्या ईश्वरप्राप्तीच्या कल्पनांचा आदर करतात आणि कांही वेळा सामावूनही घेतात़. सर्वच संप्रदायांचे ध्येय ईश्वरभक्ति आणि ईश्वरप्राप्ती हेच आहे़.

महाराष्ट्रात देखील मध्यवर्ती भागात म्हणजेच मराटवाड््यात संतांचे अस्तित्व आणि अवतार कार्य जास्त प्रकर्षाने पहायला मिळते़. प पू सौ ताई महाराजांनी मराटवाडा येथे जालना या टिकाणी प्रस्थापित केलेल्या ‘‘श्रीदत्ताश्रम‘‘ या स्थानी अनेक संतांनी मांडलेली तत्व, अनेक संप्रदायीन पद्धती यांचा अप्रतिम असा समन्वय आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळतो़. जणु कांही हा समन्वय दर्शवण्याकरिता एकाच स्थानात आपल्याला अनेक देवळांची स्थापना केलेली दिसते़. श्रीदत्ताश्रमात राघवालय, संतधाम, पादुका मंदीर आणि शंकरांचे अभिरामेश्वर मंदीर ही मंदीरं दिसतात़.

मनुष्यजीवनाची कृतार्थता साधण्यासाठीचे आणि अध्यात्मिक उन्नतीसाठीचे आश्रय स्थान हे श्रीदत्त आश्रम स्थापनेचे उददीष्ट आहे़. त्या दृृष्टीने नाम व अन्नदान यातून जन सामान्यांचा सर्वांगिण उत्कर्ष साधणे असा या स्थानाचा हेतु आहे़. गेल्या कांही वर्षात या स्थानी प्रथमच येणा-या भक्तवर्गाचे प्रमाण अनेक पटीने वाढले आहे़. अशा भक्तवर्गाला श्रीदत्ताश्रम, प पू ताईमहाराज व स्थानाच्या परंपरेबद्दल थोडक्यात माहिती करुन देणे असा या पुस्तिकेचा हेतु आहे़.

प पू सौ ताईमहाराजांनी श्रीदत्ताश्रमात एक वैशिष्ट््यपूर्ण अशी जीवनशैलीच निर्माण केली आहे़. दत्ताश्रमाच्या या जीवनशैलीवर तीन अतिशय मोटया अशा संत विभूतींचा प्रभाव आपल्याला दिसून येतो़. या तीन संत विभूती म्हणजे प पू श्री धुंडराज महाराज कवीश्वर (प पू सौ ताईमहाराजांचे दीक्षागुरु), प पू श्री ज्ञानदेव दत्तात्रेय काजळकर महाराज (प पू सौ ताईमहाराजांचे वडील) आणि प पू श्रीदत्त महाराज कवीश्वर (प पू सौ ताईमहाराजांचे गुरुबंधू)़. या त्रयींचे फोटो श्री संतधाम या श्रीदत्ताश्रमाच्या आवारातील मंदीरात पहाता येतील़. जरी प पू श्री दत्तमहाराज कवीश्वर प पू सौ ताईमहाराजांचे गुरुबंधू होते तरी प पू सौ ताईमहाराजांनी त्यांना गुरुस्थानीच मानले होते़. पुढील उता-यात या दोन्ही संतांच्या विलक्षण अशा नात्यावर उल्लेख सापडतील़. श्रीदत्तमहाराजांनाच गुरुस्थानी टेवून त्यांच्या स्मरणार्थ आश्रमाला आज श्रीदत्ताश्रम असे साजेसे नाव योजिले आहे़.

श्रीदत्ताश्रमात जर दोन गोष्टी अति महत्वपूर्ण मानल्या जात असतील तर त्या आहेत नामस्मरण आणि अन्नदाऩ. नामाला आणि अन्नदानालाच कलीयुगात महत्वाचे मानले आहे़. आश्रमात या दोन्ही गोष्टी सर्वोच्च मानल्या जातात़. पण या व्यतिरिक्तही कांही इतर रिती श्रीदत्ताश्रमातील जीवनाशी समरस झालेल्या दिसतात़. रोज सकाळी होणारी देवतांची मंगलमय अशी पूजा, पहाटेची काकड आरती, वेगवेगळया संतांच्या जन्मतिथी अथवा पूण्यतिथी उत्सवात असणारे नाम सप्ताह, विशेष उत्सवांमध्ये होणारी प्रभात फेरी, एकादशीची वारी, निरनिराळे यज्ञयाग, गोसेवा आणि पूजा हे सर्व उपव्रâमही श्रीदत्ताश्रमात फार प्रेमाने, उत्साहाने आणि शुचीतेने राबवले जातात़. प पू सौ ताईमहाराजांच्या या श्रीदत्ताश्रमामध्ये इतर पंथांंविषयीही आदरभाव जोपासला जातो़. आपापल्या आराध्य गुरुंच्या समाधीचे / स्थानाचे दर्शन घेण्याकरता निघालेले वारकरी रात्रीचा मुक्काम दत्ताश्रमात करतात़. या विविध संप्रदायातील वारक-यांचे फार प्रेमाने आणि आदराने स्वागत करण्याची दत्ताश्रमात परंपरा आहे़.

या सर्व वैशिष्ट््यपूर्ण बाबींचे बददल आणि आश्रमाच्या अध्यात्मिक परंपरेतील साहित्याचे प्रकाशन आश्रमातर्फे करण्यात आले असून ते साहित्य कचेरीत उपलब्ध आहे़.

आश्रमाच्या अध्यात्मिक परंपरेतील साहित्याचे प्रकाशन आश्रमातर्पेâ करण्यात आलेले असून ते साहित्य कचेरीत उपलब्ध आहे़.

 • होणारे कार्यक्रम


  श्री राम नवमी २५ मार्च २०१८ रविवार प.पु. ताई महाराज ७९ वा वाढदिवस

  श्री गुरुदेव दत्त
  आपणा सर्वांस माहीतच असेल की श्रीरामनवमीच्या दिवशी परम पूज्य सौ ताई महाराजांनी 79 च्या वर्षात पदार्पण केले आहे. आपणास कळवण्यात आनंद होत आहे कि,ह्या निमित्ताने 
  “श्रीराम जय राम जय जय राम”
  ह्या मंत्राचा १३ कोटी जप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा जप आपल्याघरातील देवांसमोर अथवा श्री दत्ताश्रम, जालना येथील मंदिरातील देवांसमोर बसूनकरावयाचा आहे. जपाची माळ आणि Counter चा आपण वापर करू शकता. दर महिन्यात एकदा, आपण केलेल्या जपाची नोंद श्री दत्ताश्रम, जालना येथील कार्यालयात द्यावी हि नम्र विनंती. धन्यवाद
  टीप – हा जप चालताना, बोलताना करू नये ही नम्र विनंती.


 • मासिक धून २०१८

  ७ जानेवारी २०१८

  ४ फेब्रुवारी २०१८

  २५ मार्च २०१८

  २२ एप्रिल २०१८

  २० मे २०१८

  १७ जून २०१८

  २९ जुलै २०१८

  १९ ऑगस्ट २०१८

  ०२ सप्टेंबर २०१८

  ०७ ऑक्टोंबर २०१८

  ४ नोव्हेंबर २०१८

  २३ डिसेंबर २०१८

 • उत्सव २०१८

  ०९ जानेवारी २०१८ - मंगळवार - पौष व ८ योगीराज प.पू.श्री गुळवणी महाराज व सौ लक्ष्मीबाई कवीश्वर पुण्यस्मरण

  १ फेब्रुवारी २०१८ - गुरुवार - माघ व १ -
  श्री गुरु प्रतिपदा

   ०६ फेब्रुवारी २०१८ - मंगळवार - माघ व ६-
  प.पू. श्री दत्त महाराज कवीश्वर जयंती

   २८ फेब्रुवारी २०१८- बुधवार - फाल्गुन शु. १४ -
  प.पू. श्री दत्त महाराज कवीश्वर पुण्यस्मरण

   १९ मार्च २०१८ - सोमवार चैत्र शु. २
  प.पू. श्री काजलकर महाराज जयंती

  २१ मार्च २०१८ - बुधवार- चैत्र शु. ४ -
  प.पू. श्री धुंडिराज महाराज जयंती

  २५ मार्च २०१८ - रविवार- चैत्रशु. ९ -
  श्रीराम नवमी व प. पू. सौताई महाराज वर्धापन दिन

   २० एप्रिल २०१८ - शुक्रवार - वैशाख शु. ५ -
  श्रश्रीमद आद्य शंकराचार्य जयंती

  १३ जुलै २०१८ - शुक्रवार - आषाढ शु.१ - प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी

  २७ जुलै २०१८ - शुक्रवार - आषाढ पोर्णिमा -
  श्री गुरु पोर्णिमा

  ३१ ऑगस्ट २०१८ - शुक्रवार - श्रावण व. ५ -
  प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जयंती

  ०२ सप्टेंबर २०१८ - रविवार - श्रावण व. ८ -
  श्रीकृष्ण जयंती (गोकुळाष्टमी)

  १३ सप्टेंबर २०१८ -गुरुवार - भाद्रपद शु ४ -
  प. पू. श्रीपाद श्रीवल्लभ जयंती

  ०६ ऑक्टोबर २०१८ - शनिवार - भाद्रपद व. १२-
  प. पू. श्री दत्त महाराज कवीश्वर महालय

  ०४ नोव्हेंबर २०१८ - रविवार - आश्विन व. १२-
  गुरु द्वादश

  २३ नोव्हेंबर २०१८ - शुक्रवार - कार्तिक पोर्णिमा-
  त्रिपुरी पोर्णिमा

  २१ डिसेंबर २०१८ - शुक्रवार - मार्गशीष पोर्णिमा-
  श्रीदत्त जयंती

  ३ जानेवारी २०१९ - गुरुवार - मार्गशीष व. १३-
  योगीराज प.पु.श्री.गुळवणी महाराज जयंती

  ८ जानेवारी २०१९ - मंगळवार - पौष शु.२-
  प.पु.श्री.नृसिंहसरवती स्वामी महाराज जयंती